श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १७
|| श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १७ || श्री गजानन महाराज बायकांच्या डब्यांतून खाली येउन बसले स्टेशन मास्तर त्यांची विनवणी करीत आहेत. ॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी महामंगला । जयजयाजी भक्तपाला । जयजयाजी तमालनीला । पतितपावन नरहरे ॥१॥ हिरण्यकश्यपु महाक्रूर । सज्जनाचा शत्रू थोर । तयाचें तूं फाडून उदर । मरण त्याचें साधिलें ॥२॥ प्रल्हादरक्षणासाठीं । तूं जन्मलास स्तंभापोटीं । रुप अनुपम जगजेठी । धारण तें करुन ॥३॥ दांत दाढा भयंकर । आयाळ रुळे मानेवर । नेत्र जेवीं खदिरांगार । ब्रह्मांड जाळूं पहाती ॥४॥ त्या भयंकर रुपाची । भीति नसे भक्ता साची । पिलें जेवीं वाघिणीचीं । अंगावर खेळती तिच्या ॥५॥ तुम्हां पाहून देवराया । लक्ष्मी न धजे पुढें यावया । ऐशा स्थितींत लागला पाया । भक्त तुझा नरहरे ॥६॥ तूं भक्तवत्सल लक्ष्मीकांत । ऐसें सांगत आले संत । पुरविशी भक्तमनोरथ । नाहीं न त्यासी म्हणसी कदा ॥७॥ त्या आपुल्या ब्रीदासी । जाग आतां हृषीकेशी । दासगणू लागला पायांसी । अभय असूं दे पांडुरंगा ॥८॥ गजाननाचे परम भक्त । होते कांहीं अकोल्यांत । तयाचीया सदनाप्रत । हमेशा यावें समर्थांनीं ॥९॥ चापडगांवचे बापु क