Posts

Showing posts with the label gajanan maharaj

श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय २१

Image
|| श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय २१ || श्री गजानन महाराज गोसाव्याच्या वेषांत रामचंद्र पटलास दुष्टांत देत आहेत. ॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जयाजी अनंतवेषा । जय जयाजी अविनाशा । जय जयाजी परेशा । ब्रह्मांडाधीशा नमो तुशीं ॥१॥ देवा तूं आपणांस । पतितपावन नाम खास । सर्वदा आहे धरिलेंस । याचा विचार करीं गा ॥२॥ पाप्यावरी प्रेम अमित । तुझें देवा असतें सत्य । पापीजनांनीं तुजप्रत । महत्त्व आणिलें कृपाळा ॥३॥ म्हणून माझ्या पातकासी । पाहूं नका हो हृषीकेशी । धुणें येतें जलापासीं । स्वच्छ होतें म्हणून ॥४॥ म्हणून पतितांचा कंटाळा । करुं नको रे घननीळा । काय भूमीनें सांवरिला । दिलें आहे टाकून ॥५॥ तूंच पतितपावन । तूंच पुण्यपावन । या दोन्ही दोषांपासून । तुम्ही अलग सर्वदा ॥६॥ सूर्य नाशी तमाप्रत । म्हणून कां तो कष्टी होत । कांहीं न करावें लागत । तम नासण्या रवीशीं ॥७॥ तम जों जों भेटण्या येई । तों तों तेथें प्रकाश होई । अंधारत्व अवघें जाई । त्याचें तमाचें नारायणा ॥८॥ पापपुण्याची वासना । तूंच उपजविशी नारायणा । आपला रक्षण्या मोठेपणा । पापी तूंच निर्मिशी ॥९॥ कांहीं असो आतां तरी । चिंता रहित मजल

श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय २०

Image
|| श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय २० || श्री गजानन महाराजांनी लक्ष्मण हरी जांजळ यांस बोरीबंदरवर परमहंसाच्या रूपांत भेट दिली. ॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जयाजी रुक्मिणीवरा । हे चंद्रभागातटविहारा । देवा वरदपाणी धरा । दासगणूच्या मस्तकीं ॥१॥ तूं भूपांचा भूपती । अवघेंच आहे तुझ्या हातीं । मग माझी फजीती । कां रे ऐसी मांडलीस ? ॥२॥ माझें पाप ताप दहन । करा कृपाकृशानें करून । राहो आनंदी सदा मन । तुझें भजन करावया ॥३॥ यांत अंतर केल्यास । वृथा तुला लागेल दोष । खर्‍या थोरांनीं आपणांस । बट्टा लावून घेऊं नये ॥४॥ म्हणून हे श्यामसुंदरा । राही रुक्मिणीच्या वरा । पांडुरंगा परम उदारा । माझी इच्छा पूर्ण करी ॥५॥ असो समाधिस्थ झाल्यावर । श्रीगजानन साधुवर । म्हणूं लागले नारीनर । आतां काय ह्या शेगांवीं ॥६॥ शेगांवींचा ज्ञानगभस्ती । अस्ता गेला निश्चिती । आतां काय तेथें माती । राहिली आहे निव्वळ ॥७॥ समुद्राचें आटल्या नीर । वा पुष्पतरूचा गेल्या भर । कोण त्याचें करणार । कौतुक या जगामध्यें ॥८॥ आतां खेपा शेगांवांत । करणें आहे कीं निमित्त ? । देव नसतां देव्हार्‍यांत । माळा बांधणें व्यर्थची ॥९॥ ऐसें कित्येक बो

श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १९

Image
|| श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १९ || श्री गजानन महाराज हरी पाटलांना घेऊन श्रीविठ्ठलास भेटावयास पंढरीला गेले. ॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी आनंदकंदा । जयजयादि अभेदा । माझें नमन तुझ्या पदा । असो सर्वदा अनन्यभावें ॥१॥ हे राघवा रघुपती । पाव आतां शीघ्र गती । माझा अंत पहाशी किती ? । हें कांहीं कळेना ॥२॥ खर्‍या थोरांशी कठोरता । नाहीं शोभत अनंता । याचा विचार कांहीं चित्ता । करा आपुल्या ये काळीं ॥३॥ मी दीनवाणें मारितों हांका । मला दगा देऊं नका । हे जगदीशा जगन्नायका । पावा दासगणूस ॥४॥ महाराज असतां शेगांवांत । विप्र एक काशिनाथ । जो खंडेरावाचा होय सुत । गर्दे उपनांव जयाचें ॥५॥ तो आला दर्शना । समर्थांच्या वंदिले चरणां । मूर्ति पाहून त्याच्या मना । आनंद झाला अतिशय ॥६॥ माझ्या सन्माननीय वडिलानें । जीं जीवन्मुक्‍ताचीं लक्षणें । लिहिलीं अनुभवानें । त्याची प्रत्यक्ष मूर्ति ही ॥७॥ माझें भाग्य धन्य धन्य । म्हणून हें पाहण्या चरण । आलों खामगांवाहून । त्याचें सार्थक झालें कीं ॥८॥ तों समर्थांनीं लीला केली । कोपरखिळी मारिली । काशीनाथाच्या पाठीस भली । आपुल्या परमकृपेनें ॥९॥ जा तुझा हेत पुरला ।

श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १८

Image
|| श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १८ || श्री गजानन महाराजांनी पंढरीस बापू काळ्याला श्रीविठ्ठल स्वरूपांत दर्शन दिले. ॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी चिद्रिलासा । हे गोविंदा श्रीनिवासा । हे आनंदकंदा परेशा । पाहि माम् दीनबंधो ॥१॥ हे केशवा केशीमर्दना । हे माधवा मधूसुदना । हे पूतनाप्राणशोषणा । पांडुरंगा रुक्मिणीपते ॥२॥ काय माझ्या आहे मनीं । तें तूं जाणसी चक्रपाणी । तेंच का रे तुजलागुनी । बोलून दावूं पद्मनाभा ॥३॥ भक्त जी जी इच्छा करी । ती तूं पुरविसी श्रीहरी । ऐसें पुराणाभीतरीं । आहे वर्ण्न बहुसाळ ॥४॥ म्हणून माझ्या मनोरथा । पूर्ण करा पंढरीनाथा । सोडा मनींची कठोरता । दासगणू हा तुझा असे ॥५॥ अकोटाचे शेजारीं । मुंडगांव नामें एक नगरीं । तेथें बायजा नामें खरी । समर्थाची भक्तीण असे ॥६॥ हळदी माळ्याच्या वंशांत । इचा जन्म झाला सत्य । शिवराम नामें इचा तात । भुलाबाई जननी असे ॥७॥ बायजाचे बाळपणीं । लग्न झालें होतें जाणी । ललाटीं जें विधात्यांनीं । लिहिलें असेल तेंच घडे ॥८॥ बायजा आली तारूण्यांत । गर्भाधान करण्याप्रत । घेऊन गेला तिचा तात । जामाताच्या गृहासी ॥९॥ परी उपयोग नाहीं झाला । जामात षंढ