श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय २१
|| श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय २१ || श्री गजानन महाराज गोसाव्याच्या वेषांत रामचंद्र पटलास दुष्टांत देत आहेत. ॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जयाजी अनंतवेषा । जय जयाजी अविनाशा । जय जयाजी परेशा । ब्रह्मांडाधीशा नमो तुशीं ॥१॥ देवा तूं आपणांस । पतितपावन नाम खास । सर्वदा आहे धरिलेंस । याचा विचार करीं गा ॥२॥ पाप्यावरी प्रेम अमित । तुझें देवा असतें सत्य । पापीजनांनीं तुजप्रत । महत्त्व आणिलें कृपाळा ॥३॥ म्हणून माझ्या पातकासी । पाहूं नका हो हृषीकेशी । धुणें येतें जलापासीं । स्वच्छ होतें म्हणून ॥४॥ म्हणून पतितांचा कंटाळा । करुं नको रे घननीळा । काय भूमीनें सांवरिला । दिलें आहे टाकून ॥५॥ तूंच पतितपावन । तूंच पुण्यपावन । या दोन्ही दोषांपासून । तुम्ही अलग सर्वदा ॥६॥ सूर्य नाशी तमाप्रत । म्हणून कां तो कष्टी होत । कांहीं न करावें लागत । तम नासण्या रवीशीं ॥७॥ तम जों जों भेटण्या येई । तों तों तेथें प्रकाश होई । अंधारत्व अवघें जाई । त्याचें तमाचें नारायणा ॥८॥ पापपुण्याची वासना । तूंच उपजविशी नारायणा । आपला रक्षण्या मोठेपणा । पापी तूंच निर्मिशी ॥९॥ कांहीं असो आतां तरी । चिंता रहित मजल