संत श्री गजानन महाराज ( Sant Shri Gajanan Maharaj Shegaon )
!! गण गण गणात बोते !! ॥ अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद । भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय ॥ ----- ।। श्री गजानन महाराज परिचय ।। संत श्री गजानन महाराजांना भगवान दत्तात्रेयांचे तिसरे रूप मानले जाते. आधीची दोन रूपे म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि शिर्डीचे साई बाबा. महाराजांचे सर्वप्रथम दर्शन शेगाव येथे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी झाले. महाराजांच्या जन्माचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही, म्हणून २३ फेब्रुवारी हा दिवस ‘प्रगट दिन’ म्हणून साजरा केला जातो. गजानन महाराज परमज्ञानी, आध्यात्मिक आणि महान योगी होते. महाराजांनी या भूतलावर अवघे ३२ वर्षे वास्तव्य केले. या काळात त्यांनी आपल्या अद्भुत लीलांद्वारे भक्तांचे जीवन समृद्ध केले. महाराज अवलिया संत होते, तरी स्वच्छतेबाबत अत्यंत जागरूक होते. महाराजांनी भक्तांना रोगमुक्त व भयमुक्त केले, भूतबाधा दूर केल्या, गरिबांना उन्नत केले, तसेच कुत्सितांचे अज्ञान दूर करून दांभिकांना योग्य धडा शिकवला. मानवतेला सदाचाराने समृद्ध करून महाराज ८ सप्टेंबर १९१० रोजी समाधिस्त झाले. तत्पूर्वी...