Posts

श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १७

Image
|| श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १७ || श्री गजानन महाराज बायकांच्या डब्यांतून खाली येउन बसले स्टेशन मास्तर त्यांची विनवणी करीत आहेत. ॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी महामंगला । जयजयाजी भक्तपाला । जयजयाजी तमालनीला । पतितपावन नरहरे ॥१॥ हिरण्यकश्यपु महाक्रूर । सज्जनाचा शत्रू थोर । तयाचें तूं फाडून उदर । मरण त्याचें साधिलें ॥२॥ प्रल्हादरक्षणासाठीं । तूं जन्मलास स्तंभापोटीं । रुप अनुपम जगजेठी । धारण तें करुन ॥३॥ दांत दाढा भयंकर । आयाळ रुळे मानेवर । नेत्र जेवीं खदिरांगार । ब्रह्मांड जाळूं पहाती ॥४॥ त्या भयंकर रुपाची । भीति नसे भक्ता साची । पिलें जेवीं वाघिणीचीं । अंगावर खेळती तिच्या ॥५॥ तुम्हां पाहून देवराया । लक्ष्मी न धजे पुढें यावया । ऐशा स्थितींत लागला पाया । भक्त तुझा नरहरे ॥६॥ तूं भक्तवत्सल लक्ष्मीकांत । ऐसें सांगत आले संत । पुरविशी भक्‍तमनोरथ । नाहीं न त्यासी म्हणसी कदा ॥७॥ त्या आपुल्या ब्रीदासी । जाग आतां हृषीकेशी । दासगणू लागला पायांसी । अभय असूं दे पांडुरंगा ॥८॥ गजाननाचे परम भक्त । होते कांहीं अकोल्यांत । तयाचीया सदनाप्रत । हमेशा यावें समर्थांनीं ॥९॥ चापडगांवचे बापु क

श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १६

Image
|| श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १६ || श्री गजानन महाराजांना कवरपुत्र त्र्यंबक कांदा-भाकरीचे जेवण देत आहे. ॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी परशुधरा । हे जमदग्नीच्या कुमारा । परशुरामा परमेश्वरा । आतां उपेक्षा करूं नको ॥१॥ तूं सहस्त्रार्जुनातें दंडून । केलें द्विजांचें संरक्षण । ब्राह्मणांचा अपमान । सहन झाला नाहीं तुला ॥२॥ आतां मात्र डोळे मिटिसी । कां रे देवा ब्राह्मणांविशीं ? । काय आहे लागली तुसी । गाढ निद्रा येधवां ॥३॥ म्हणून डोळे मिटूं नका । स्वस्थ ऐसें बसूं नका । आणीबाणीचा प्रसंग देखा । आहे हरी सांप्रत ॥४॥ तुझ्या वशिल्यावांचून । अवघीं कृत्यें आहेत शीण । आर्यसंस्कृतीचें रक्षण । होणें नाहीं तुझ्याविण ॥५॥ गजाननमाया अघटित । कोण जाणें तिजप्रत । महाराजांचा एक भक्त । पुंडलिक नामें मूंडगांवीं ॥६॥ हा शेगांवची करी वारी । समर्थाविषयीं प्रेम भारी । हमेश त्यांचें चिंतन करी । एकाग्रशा मनानें ॥७॥ त्याच गांवीं भागाबाई । एक ठाकरीण होती पाही । निष्ठा तिची एक्याही । ठिकाणासीं बसत नसे ॥८॥ ती दांभिक होती फार । सदा दंभाचा बाजार । भरवून भोंदी नारीनर । हाच धंदा तियेचा ॥९॥ ती बोलली पुं

श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १५

Image
|| श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १५ || श्री गजानन महाराज उजव्या बाजूस खुर्चीवर बसलेले असून लो. टिळक भाषण करीत आहेत. ॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे कश्यपात्मज वामना । हे बटुरुपधारी नारायणा । तूं बलीच्या घेऊन दाना । कृतार्थ त्याला केलेंस ॥१॥ राज्य मृत्युलोकीचें । घेतलें त्वां जरी साचें । तरी दिलें पाताळाचें । राज्य बलीकारणें ॥२॥ आंवळा घेऊन नारळ दिला । तुम्ही त्या पुण्यवंत बलीला । आणि त्याच्या भक्तीस्तव झाला । द्वारपाळ द्वारीं तुम्ही ॥३॥ या मन्वंतरानंतर । बलीच आहे होणार । देवांचा राजराजेश्वर । देवा तुझ्या वरानें ॥४॥ एक घटकेंत अनंता । चहूं वेदांच्या संहिता । पठण केल्या बुद्धिमत्ता । केवढी तुझी अगाध तरी ! ॥५॥ अवघ्यां तुझ्या अवतारीं । हा सोंवळा अवतार श्रीहरी । कोणाचाही भूमीवरी । वध न तुम्ही केलांत ॥६॥ शत्रुमित्राच्या घरीं दिवा । ये अवतारीं लाविला बरवा । देव आणि दानवा । तूं वंद्य सारखाच ॥७॥ देव तेही आनंदविले । राक्षस तेही रक्षिलें । आपलें ईशत्व सांभाळिलें । याच अवतारीं देवा तूं ॥८॥ तुला माझा नमस्कार । असो वामना वारंवार । मस्तकीं ठेवा वरद कर । तुम्ही दासगणूच्या ॥९॥ टिळक बाळ गंगाधर ।

श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १४

Image
|| श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १४ || श्री गजानन महाराजांच्या कृपेने प्रत्यक्ष नर्मदादेवीने सर्वांचे रक्षण केले. ॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे कौसल्यात्मज रामराया । हे रघुकुलभूषणा करुणालया । सीतापते करा दया । आतां या लेंकरासी ॥१॥ ताटिका त्वां उध्दरली । अहिल्या शिळा सजीव केली । शबरीची पुरवली । इच्छा तूं दशरथे ॥२॥ भक्तरक्षणा कारण । सोडिलें नृपसिंहासन । वानर केलेसे बलवान् । केवळ आपल्या कृपेनें ॥३॥ शिळा तरल्या सागरीम । तुझ्या नामें रावणारी । बसविलास गादीवरी । भक्त आपला बिभीषण ॥४॥ जो जो आला शरण पदा । तुझ्या कीं हे आनंदकंदा । दैन्य, दुःख, आपदा । त्याच्या त्वां वारिल्यास ॥५॥ हें मनीं आणावें । दासगणूस सांभाळावें । बालकानें धांवावें । जननिविण कोणाकडे ? ॥६॥ तूं जननी जनिता सद्गुरु । तूं भक्तांना कल्पतरु । भवनदीचें भव्य तारूं । तूंच कीं रे रामराया ! ॥७॥ एक खेडेगांवचा । रहिवासी मेहकर तालुक्याचा । बंडूतात्या नांवाचा । ब्राह्मण होता विबुध हो ॥८॥ हा बंडूतात्या ब्राह्मण । सदाचारसंपन्न । उदार होतें ज्याचें मन । गृहस्थाश्रम चालवी ॥९॥ श्रोते या प्रपंचांत । संकटें येती अतोनात । परी नाहीं पहा

श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १३

Image
|| श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १३ || श्री गजानन महाराजांच्या प्रसादाने महारोगीसुध्दा बरे झाले. श्रीगणेशाय नमः ॥ हे संतवरदा श्रीधरा । हे दयेच्या सागरा । हे गोपगोपीप्रियकरा । तमालनीळा पाव हरी ॥१॥ तुझें ईशत्व पाहण्याकरितां । जेव्हां झाला विधाता । गाई-वासरें चोरितां । यमुनातटीं गोकुळांत ॥२॥ तेव्हां तूं निजलीलेंकरुन । गाई वासरें होऊन । ब्रह्मदेवाकारण । आपलें ईशत्व दाविलें ॥३॥ दुष्ट ऐशा कालियाला । यमुनेमाजीं तुडवून भला । रमणकद्वीपा धाडिला । गोप निर्भय करण्यास ॥४॥ तेवीं माझ्या दुर्दैवा । तुडवूनी या वासुदेवा । दासगणू हा करावा । निर्भय सर्व बाजूंनीं ॥५॥ मी अजाणभक्त तुझा हरी । परी देवा कृपा करी । मी आहे अनाधिकारी । योग्य न तुझ्या कृपेस ॥६॥ ऐसें जरी आहे सत्य । परी नको पाहूंस अंत । माझी चिंता वार त्वरित । आपुल्या कृपाकटाक्षें ॥७॥ आतां श्रोते सावधान । बंकट, हरी, लक्ष्मण । विठू जगदेवादि मिळून । गेले वर्गणी जमवावया ॥८॥ भाविकांनीं वर्गणी दिली । कुत्सितांनीं कुटाळी केली । वर्गणीची कांहो पडली । जरुर तुमच्या साधूस्तव ॥९॥ गजानन म्हणतां महासंत । जें न घडे तें घडवीत । मग त्यांच्या मठा

श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १२

Image
|| श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १२ || श्री गजानन महाराजांचा पितांबराने धावा केल्याबरोबर वठलेल्या वृक्षाला पालवी फुटली. ॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे गणाधीशा गणपती । मयुरेश्वरा विमलकीर्ति । माझ्या हृदयीं करून वस्ती । ग्रंथ कळसास नेई हा ॥१॥ तूं ज्ञानबुध्दीचा दाता । तूं भक्तमनोरथ पुरविता । विघ्ननगातें संहारिता । तूंच एक गणराया ॥२॥ तूं साक्षात् चिंतामणी । चिंतिलेलें देशी जाणी । आपुल्या भक्तांलागूनी । ऐसें पुराणें म्हणतात ॥३॥ माझ्या मनींची अवघी चिंता । लयास नेई एकदंता । लंबोदरा पार्वतीसुता । भालचंद्रा सिंदुरारे ॥४॥ असो बच्चुलाल अग्रवाला । होता एक आकोल्याला । धन-कनक- संपन्न भला । मनाचाही उदार जो ॥५॥ त्यानें हकिकत कारंज्याची । म्हणजे लक्ष्मण पंत धुड्याची । कर्णोपकर्णी ऐकली साची । तेणें साशंक जहाला ॥६॥ तें खरें खोटें पहाण्यास । विचार करी चित्तास । तों एके समयास । महाराज आले अकोल्याला ॥७॥ येऊन बच्चुलाला घरीं । बैसते झाले ओट्यावरी । कीं गजानन साक्षात्कारी । भक्त आपुला जाणून ॥८॥ बच्चुलाला आनंद झाला । तो समर्थांसी ऐसें वदला । आज गुरुराया वाटतें मला । आपली पूजा करावी ॥९॥ ऐसें ऐकतां भाष